कोपरगावात २३ शाळांमध्ये २८७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
[ २ फेब्रुवारी शेवटची तारीख ]
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यात आरटीई अंतर्गत खाजगी विनाअनुदानित स्वयं अर्थ साइत शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे त्यानुसार तालुक्यातील सुमारे २३ शाळांमध्ये २८७ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २ फेब्रुवारी पर्यंत मुदत आहे .या मुदतीत अर्ज दाखल करावेत असे आवाहन कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांनी केले.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटीई देण्यात येणाऱ्या २५ टक्के आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेला यंदा मुदतीत प्रारंभ झाला आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे सर्व प्रकारच्या विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शाळांत दुर्बल वंचित गटातील बालकांना मोफत प्रवेश केला जातो.

शाळांना या शुल्काची प्रतिकृती शासनामार्फत केली जाते या निर्णयामुळे अनेक गरजू गरीब व सर्वसामान्यांना इंग्रजी माध्यमाच्या तसेच दर्जेदार शाळांमधील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते .शासनाच्या निकषाप्रमाणे तालुक्यातील जोगेश्वरी इंटरनॅशनल स्कूल , रेनबो इंटरनॅशनल स्कूल जेऊर कुंभारी, वात्सल्य माॕडेल स्कूल पोहेगाव , श्री मयुरेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पोहेगाव,गौतम पब्लिक स्कूल गौतमनगर,फार्मर्स डेन पब्लिक स्कूल चासनळी ,गोदा व्हॕली इंग्लिश मीडियम रवंदे,तेजग्यान इंग्लिश मीडियम स्कूल ब्राम्हणगाव,साईशक्ति इंग्लिश मीडियम स्कूल कासली,श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम इंग्लिश मीडियम स्कूल शिरसगाव,शिवबालक मंदिर उक्कडगाव,संजीवनी अॕकॕडमी,संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल ,एसएमएसके इंग्लिश मीडियम स्कूल ,संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी विद्या मंदिर कोकमठाण,आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल कोकमठाण,समता इंटरनॅशनल स्कूल ,आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल ,स्व.दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालय कोकमठाण,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव ,नामदेवराव परजणे पाटिल इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत संधी उपलब्ध आहे .
प्रवेशासाठी ऑनलाईन माहिती भरावी लागणार आहे. .पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा ,जातीचा किंवा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा ,पालकाचे व पाल्याचे आधार कार्ड ,अपंगत्वाचा पुरावा ,तसेच ऑनलाइन दिलेल्या इतर कागदपत्र पालकांनी
या संकेतस्थळावर आपल्या पाल्याची ऑनलाईन माहिती भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान शिक्षण विभागाने केले आहे.