banner ads

जनतेला समस्यांच्या वाऱ्यावर सोडून आमदार काळे गायब - नितीन शिंदे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

kopargaonsamachar
0

 जनतेला समस्यांच्या वाऱ्यावर सोडून आमदार काळे गायब - नितीन शिंदे, प्रदेश सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

विधानसभेत आयतेच जांभूळ तोंडांत पडल्याने त्याची किंमत नसणारे आमदार आशुतोष काळे  हे बोटावर मोजण्या एवढे देखील तास मतदारसंघात थांबले नाही एकीकडे कोपरगाव शहरातला पाणी पुरवठा समस्या वाढत आहे.तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.नागरिकांना समस्या भेडसावत आहे. पोहेगाव सारख्या ठिकाणी भर दिवसा दरोडा पडला त्यानंतर अद्याप देखील आमदार उजेडात आलेले नाहीत.एकच जनता दरबार घेऊन तक्रारींचा ढिग व महापुर बघून जनतेला समस्यांच्या वाऱ्यावर सोडून आमदार गायब झाले असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे  प्रदेश सचिव,
काँग्रेसचे नेते नितीन शिंदे यांनी केली आहे.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे  प्रदेश सचिव, नितीन शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या  पञकात म्हटले आहे की
महाविकास आघाडीने कमी काळात टोकाची लढाई दिली, राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या निवडूक प्रचारसभा दरम्यान कोपरगांवतील भव्य सभा व जनतेचा कल बघून काळे यांची धावपळ वाढवणारी कुणाच्या हि नजरेततून सुटली नाही पण  कोल्हे यांच्या मदतीने काळे यांना निवडणूक विजयाचे फळ चाखता आले अन्यथा निकाल अनपेक्षित लागला असता याची त्यांना जाणीव आहे. आता निवडणूक संपली त्यामुळे पुन्हा जनतेला गृहीत धरून वागणे त्यांचे सुरू आहे. ते सत्तेची ऊब घेत आहे मात्र जनतेला आता समस्यांच्या कडाक्यात उभे केले आहे हे त्यांनी विसरू नये.

मतदारसंघात समस्यांचा डोंगर झाला आहे.निदान ज्या कोल्हे कुटुंबाने काळे यांची बाजु घेऊन विधानसभा सदस्य म्हणून निवडणून आणले त्यांनी तरी आता काळे यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी रेटा लावावा अन्यथा सामान्य जनता सहमतीच्या राजकीय वाटचालीत भरडली जाईल हे सत्य आहे.मागील पाच वर्षात अक्षरशः जनते ची पिळवणूक, अवैध धंदे तेजीत अशी वाईट परिस्थिती  होती.शासकिय कार्यालयात सामान्य जनतेची पिळवणूक, शेती चे अंतरलेले पाटपाणी व चारी  दुरूस्ती,विज खोळंबा रोहित्र दुरूस्ती व इतर. निवडणूक निकाल लागून दोन महिने उलटून गेले तरीही अद्याप आमदार जनतेला एक जनता दरबार सोडला तर पुन्हा नजरेस पडले नाही ही शोकांतिका आहे.


तालुक्यात राजरोज घडणारे गुन्हे,चोऱ्या यामुळे नागरिक त्रस्त असून आमदार मात्र डोळ्यावर गांधारीची पट्टी बांधून कृती पासून निद्रिस्त आहे. असेच सुरू राहिले तर भविष्यात कोणी आमदार पाहिले का आमदार अशी म्हणायची वेळ जनतेवर येईल असेही   शिंदे यांनी प्रसिद्धी  पञकात म्हटले  आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!