banner ads

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘शांतता पुणेकर वाचत आहे’ उपक्रम उत्साहात साजरा

kopargaonsamachar
0

 एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘शांतता पुणेकर वाचत आहे उपक्रम उत्साहात साजरा


कोपरगाव - रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे

राष्ट्रीय सेवा योजनाएनसीसी विद्यार्थी कल्याण मंडळग्रंथलयकमवा व शिका योजना ,मराठी विभाग वतीने 'शांतता पुणेकर  वाचत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण मंत्रालय भारत सरकारराष्ट्रीय पुस्तक न्यास नवी दिल्लीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. दुपारी १२ ते १ या वेळेत वाचन   उपक्रम  महाविद्यालयात आयोजित करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे हे होते. प्राचार्य डॉ. सरोदे म्हणाले वाचन संस्कृती जोपासली तर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल या उपक्रमातून वाचन चळवळीला प्रोत्साहन मिळेल विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मराठी भाषामराठी साहित्य ,मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे या उपक्रमातून निश्चितपणे साध्य होईलयामध्ये प्राध्यापकविद्यार्थीमाजी विद्यार्थीपालक यांनी आपल्या आवडत्या पुस्तकाचे वाचन केले .


तसेच सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते माननीय श्री प्रवीण तरडे यांचे विशेष व्याख्यान ऑनलाइन विद्यार्थ्यांनी ऐकले. या उपक्रमात महाविद्यालयातील 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन सेवकांनीही भाग घेतला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण मंडळाचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर माधव यशवंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ .अर्जुन भागवत ,  प्रा. डॉ. मोहन सांगळे,   प्रा.डॉ निलेश मालपुरेप्रा .अरुण देशमुखप्रा. डॉ. उज्वला भोरकार्यालयीन सेवक श्री सुनील गोसावीविद्यार्थी विद्यार्थिनीपालक उपस्थित होते.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!