. सौ. सुशीलाबाई (माई ) शंकरराव काळे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेचे, श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे कै.सौ.सुशीलाबाई(माई) शंकररावजी काळे यांचे स्मृती-प्रीत्यर्थ ऑनलाइन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा गुरुवार दि.२ जानेवारी व शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ आयोजित केली आहे.
या स्पर्धेचे हे २४ वे वर्ष आहे. सहकार, शिक्षण, समाजकारण, शेती आणि जलसिंचन क्षेत्रात भरीव कार्य करणारे राज्याचे सहकार व शिक्षण मंत्री पद भुषविलेले रयत शिक्षण संस्थेचे १५ वर्षे चेअरमन उपाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा परिषदेचे १० वर्ष अध्यक्ष राहिलेले, माजी खासदार व को.सा.का. उद्योग समूहाचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय शंकररावजी काळे अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. कै. सुशिलाबाई (माई ) शंकरराव काळे यांचा गौतम एज्युकेशन सोसायटी तसेच शिक्षण क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध होता. माईनीं या महाविद्यालयाशी सतत संपर्क ठेवून कृतिशील जिव्हाळ्याचे नाते निर्माण केलेले होते. तरी त्यांच्या स्मृतीचा सुगंध न संपणारा आहे. हा ‘स्मृती ठेवा पणतिच्या रूपाने उच्च शिक्षण क्षेत्राचा जपावा’ या भावनेने काळे कुटुंबाच्या सहकार्याने भव्य राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केलेले असून स्पर्धेसाठी आपण महाविद्यालयातील दोन स्पर्धकांचे व्हिडिओ पाठवावे.
स्पर्धेचे विषय:
१. एक समर्पणशील त्यागमूर्ती कै. सौ. सुशिलाबाई (माई) शंकरराव काळे
२. अभिजात मराठी भाषा, आमचा अभिमान..!
३. भारताचे महान सुपुत्र पद्मभूषण, उद्योगमहर्षी रतन टाटा
४. राजकारण : काल, आज आणि उद्या
५. संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना..
६. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आणि चॅट जी.पी.टी. अभ्यास पद्धती कुठे नेणार?
७. महिला सुरक्षा : चिंता व चिंतन
८. बहुआयामी व्यक्तिमत्व कर्मवीर शंकरराव काळेसाहेब
खालील लिंकवर क्लिक करून स्पर्धेतील आपला सहभाग नोंदवावा.अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०२५
सिनिअर विभाग- https://forms.gle/
व्हिडिओ पाठवण्याचा टेलिग्राम नंबर प्रा. किरण पवार-9552981065
ज्युनिअर विभाग - https://forms.gle/
व्हिडिओ पाठवण्याचा टेलिग्राम नंबर प्रा. अमोल चंदनशिवे- 9552130450
असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. या स्पर्धेचे मुख्य संयोजक
प्रो. (डॉ.) बाबासाहेब शेंडगे हे आहेत. संपर्क क्रमांक -९७६२८८४९४३





