banner ads

जिल्ह्यात २ हजार ४९४ मतदारांचे टपाली मतदान

kopargaonsamachar
0

 जिल्ह्यात २ हजार ४९४  मतदारांचे  टपाली मतदान

८५ वर्षांवरील २ हजार १०६ ज्येष्ठ नागरिक, ३३२ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान







अहिल्यानगर, -

 - जिल्ह्यातील १२  विधानसभा मतदारसंघात २ हजार ४९४  मतदारांनी  टपाली मतदानाचा हक्क बजावला. यात ८५ वर्षांवरील २ हजार १०६ ज्येष्ठ नागरिक आणि ३३२ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला, अशी माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणाऱ्या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. यासाठी  नमूना १२ डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत तर अहमदनगर  शहर मतदारसंघात ८ आणि  ९ नोव्हेंबर रोजी गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. अकोले विधानसभा मतदारसंघात २२६ ज्येष्ठ नागरिक, २६ दिव्यांग असे एकूण २५२ मतदारांनी गृह मतदान केले. संगमनेर मतदारसंघात १९९ ज्येष्ठ नागरिक, ३४ दिव्यांग असे एकूण २३३, शिर्डी मतदारसंघात १७५ ज्येष्ठ नागरिक, १७ दिव्यांग असे एकूण १९२, कोपरगाव मतदारसंघात १६९ ज्येष्ठ नागरिक, ३३ दिव्यांग असे एकूण २०२, श्रीरामपूर मतदारसंघात १०६ ज्येष्ठ नागरिक,२० दिव्यांग असे एकूण १२६ मतदारांनी गृह मतदान केले.

 नेवासा मतदारसंघात १५८ ज्येष्ठ नागरिक, २५ दिव्यांग असे एकूण १८३, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात १७७ ज्येष्ठ नागरिक, ४८ दिव्यांग असे एकूण २२५, राहूरी मतदारसंघात ११७ ज्येष्ठ नागरिक, २२ दिव्यांग असे एकूण १३९, पारनेर मतदारसंघात १४५ ज्येष्ठ नागरिक, २० दिव्यांग असे एकूण १६५, श्रीगोंदा मतदारसंघात २४८ ज्येष्ठ नागरिक, ४५ दिव्यांग असे एकूण २९३, कर्जत - जामखेड मतदारसंघात  २६४ ज्येष्ठ नागरिक, ३० दिव्यांग असे एकूण २९४ मतदारांनी गृह मतदान केले. 

अहमदनगर शहर मतदारसंघात  १२२ ज्येष्ठ नागरिक, १२ दिव्यांग असे एकूण  १३४ मतदारांनी गृह मतदान केले आहे. या मोहीमेत अत्यावश्यक सेवेतील  ५६ कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान  सुविधेचा लाभ घेतला आहे.  मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात आली. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखीखाली गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!