banner ads

आशुतोष काळे यांना निवडून द्या पुढील जबाबदारी आपल्यावर सोडा -- अजितदादा पवार

kopargaonsamachar
0

 आशुतोष काळे यांना जास्त मताधिक्याने   निवडून द्या पुढील जबाबदारी आपल्यावर सोडा -- अजितदादा पवार

आगामी काळात आशुतोष काळेंना मंत्री करण्याचे अजित पवारांचे संकेत ]

प्रचार सभेला विक्रमी गर्दी








कोपरगाव प्रतिनिधी :

 अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासात शंकरराव काळे यांनी वाहून घेतले होते. त्यांचाच वारसा आमदार आशुतोष काळे पुढे नेत आहे. मागील निवडणुकीत जनतेने काठावर निवडून दिले तरी शेकडो कोटींचा निधी आणला. मात्र यावेळी आशुतोष काळे यांना पंच्यांशी हजार मतांनी निवडून द्या पुढील जबाबदारी आपल्यावर सोडा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जाहीर सभेद्वारे केले.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी अजित दादा पवार यांनी जाहीर सभा घेतली . यावेळी ते बोलत होते . या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संखेने मंचावर पहिल्यांदाच एकत्रित उपस्थित राहिले . यावेळी अजित दादा यांनी महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या साठी युतीधर्म पाळत थांबण्याचा निर्णय घेतल्या बद्दल कोल्हे परिवाराचे आभार मानले. आशुतोष काळेंना बळ देण्याची विनंती केली आणि कोल्हेंनी ती विंनती मान्य केली असल्याचे सांगितले . आशुतोष काळे हे स्वतः ऐवजी समाजासाठी मागणारा व्यक्ती आहे . त्यांनी निधीसाठी हट्ट केला मात्र तो जनतेसाठी केला कोपरगावच्या विकासासाठी साठी ! त्यामुळे त्यांनी जेव्हा कधी पोलीस वसाहत, पाच नंबर  साठवण तलाव निधी, जे जे मागितलं ते देण्याचा प्रयत्न मी केला . त्यामुळे कोपरगावच्या जनतेनेही आता आशुतोष काळे यांच्या पाठीशी उभे राहावे. मागील वेळी काठावर निवडून दिले आता मात्र त्यांना अधिकाधिक मताधिक्य द्या. जेव्हढं लीड जास्त तेव्हढा जास्त निधी आपणा देणार. असे अस्वासन अजित दादा यांनी उपस्थित मतदारांना दिले. आम्ही निधी देऊन जनतेवर उपकार करत नाही तर ते आमचं कर्तव्य आहे. मात्र भरघोस निधी देऊन आम्ही आमची जबाबदारी पार पाडली, आता पुढील जबाबदारी मतदारांची असणार असल्याचेही अजित दादा म्हणाले.








त्यांच्या काळात त्यांनी सव्वा रुपयाही दिला नाही ! विरोधक फेक नेरेटिव्ह सेट करत आहे. 

आपल्या विरोधकांचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की लाडकी बहिण योजनेवरून विरोधक आमच्यावर टीका करतात . मात्र त्यांच्या काळात त्यांनी सव्वा रुपयाही दिला नाही. महिला भगिनी, तरुण तरुणी आमच्या पाठीशी आहे. विरोधक फेक नेरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप करताना ते म्हणाले की बाबासाहेबानी दिलेलं संविधान एक राहण्यासाठी दिल. आम्ही संविधान बदलणार हा फेक नेरेटिव्ह सेट केला. सी ए ए ,एन आर सी कायद्या बाबत चुकीचं गैरसमज मुस्लिम समजामध्ये पसरवला. काहीही खोटं बोलतात. त्याची विनाकारण किंमत आम्हास मोजावी लागली आहे. मात्र आता जनतेने त्यांच्या या खोट्या प्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन केले. त्याच प्रमाणे आम्ही विकासाठी महायुतीमध्ये सामील झालो असून आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारा सोडली नाही.

आपल्या प्रस्ताविकाच्या भाषणात आमदार आशुतोष काळे म्हणाले की आपण जे काही विकास कामे झाली त्याच्याच बळावर निवडणूकिला सामोरे जात आहे. राजकारण हे फक्त निवडणुकी पुरतेच करावे हा विचार स्व. कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी दिला आहे. त्यामुळे विकास कामे करताना पाच वर्षात सर्वाना सोबत घेत विककामे केली. कोरोना काळामध्ये दोन वर्षे अडचणी आल्या, असे असतानाही अनेक कामे मंजूर केली, त्यात काही पूर्ण झाली, काही प्रगती पथावर आहेत . हा विकासाचा रथ असाच पुढे सुरु ठेवण्यासाठी मतदारांनी आपले मतदान रुपी आशीर्वाद पुन्हा देऊन सेवेची संधी द्यावी अशी विनंती केली. यावेळी मंचावर माजी आमदार अशोकराव काळे , माजी नगराध्यक्ष विजय वाहाडणे,गोदावरी दूध संघाचेअध्यक्ष राजेश परजणे,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,राजेंद्र जाधव,संभाजी काळे,चैताली काळे,कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण,अशोक रोहमारे,कृष्णा आढाव,चारुदत्त सिनगर,नारायण मांजरे,पदमकांत कुदळे,अजय गर्जे,डॉ.मच्छिंद्र बेर्डे,सचिन मुजगुले,चंद्रशेखर कुलकर्णी,शकील चोपदार ,विश्वासराव महाले, महेमूद सय्यद आदीसह मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!