banner ads

सौ.चैताली काळेंचा ग्रामीण भागातील गावागावात प्रचार फेऱ्या व बैठकांचा धडाका

kopargaonsamachar
0

 सौ.चैताली काळेंचा  ग्रामीण भागातील गावागावात  प्रचार फेऱ्या व बैठकांचा धडाका


कोपरगांव / लक्ष्मण वावरे

- विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिले असून कोपरगाव विधानसभा मतदार संघात महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ. आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या अर्धांगिनी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे या देखील प्रचारात सक्रीय असून मतदार संघातील ग्रामीण भागातील गावागावात त्यांचा प्रचार फेऱ्यांचा व बैठकांचा धडाका सुरु असून कोपरगाव शहरातील विविध प्रभागातील त्यांच्या कॉर्नर सभा चांगल्याच गाजत असून सर्वत्र नागरिकांसह महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे कोपरगाव विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघात केलेली विविध विकासकामे व तसेच कोपरगाव शहरातील अनेक महत्वपूर्ण कामांबरोबरच नागरिकांसह महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सोडविला असून नागरिकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसात वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होवून सर्वच नळ कनेक्शन नवीन वितरण व्यवस्थेवर स्थलांतरीत केल्यानंतर नागरिकांना रोज नियमित पाणी मिळणार आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून हाच झालेला विकास जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे मतदारांसमोर मांडत आहे आणि त्यांच्या कॉर्नर सभांना देखील मोठी गर्दी होत आहे.

गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देवून त्यांची आर्थिक उन्नती साधली आहे. बचत गटाच्या महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना विविध बँकांच्या माध्यमातून अर्थ सहाय्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याकामी आ.आशुतोष काळे यांचे मोठे सहकार्य मिळत असून बचत गटाच्या महिलांचे मोठे संगठन करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सौ.चैताली काळे सातत्याने प्रयत्न करीत असून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आ.आशुतोष काळेंच्या प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळत आहे.

आ.आशुतोष काळेंचे कोपरगाव शहरासह मतदार संघाच्या विकासात मोठे योगदान असून रस्ते, वीज, पाणी, आरोग्य हे मुलभूत प्रश्न या पाच वर्षात मार्गी लागले आहे.शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांनी मिळवून दिला आहे.महायुती शासनाने सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेचा मतदारसंघातील सर्वच पात्र माता भगिनींना लाभ मिळावा यासाठी स्वत:ची यंत्रणा उभी करून सर्व महिलांचे अर्ज भरून घेवून अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून जवळपास सर्वच पात्र महिला भगिनींना या योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांच्याकडून नागरिकांच्या मतदारसंघाच्या विकासाच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या असून त्या येत्या काळात पूर्ण देखील होणार याची सुज्ञ मतदारांना पाच वर्षात झालेल्या विकास कामांवरून खात्री पटलेली आहे. त्यामुळेच आ. आशुतोष काळेंच्या प्रचारार्थ होत असलेल्या कॉर्नर सभांना मोठी गर्दी होत आहे

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!