…अन् कोपरगावच्या शाळेतील फळे बोलू लागले!
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
- कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे...लोकशाहीच्या उत्सवाचं...शाळेत प्रवेश करताच शाळेतील कापडी, एखादं भित्तीचित्र किंवा रांगोळी लक्ष आकर्षून घेते. शिवाय इथले 'बोलके फळे' अभिनव पद्धतीने संदेश देत आहेत. चित्र आणि घोषवाक्य या माध्यमातून साधला जाणारा हा संवाद विशेष ठरला आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात ७५ टक्के मतदानाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले आहे. याअंतर्गत केंद्रीय संचार ब्युरोमार्फत कमी मतदान असलेल्या गावात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. विविध शाळा-महाविद्यालयांनी रॅली, रांगोळी, भित्तीपत्रक, वचनपत्रे आदींच्या माध्यमातून जनजागृतीत सहभाग घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मतदानाची प्रतिज्ञादेखील घेण्यात येत आहे. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामान्य नागरिकांनीही या प्रयत्नात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी कोपरगाव येथील जिल्हा परिषद शाळांधील शिक्षकांनी शाळेतील फळ्यांचा अभिनव पद्धतीने उपयोग करून घेत मतदानाचा प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमात सहभाग घेतांना कोपरगाव येथील शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शाळेच्या भिंतीवर लावलेल्या फळ्यांचा कल्पकतेने वापर केला आहे. रंगीत खडूंचा उपयोग करीत या फळ्यांवर मतदान जागृतीचे विविध संदेश सुंदररितीने रेखाटण्यात येत आहेत. रोज नवनवीन संदेश या माध्यमातून देण्यात येत आहेत. या उपक्रमात विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात गिरमे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथम





