शेतकरी वडीलांचे स्वप्न संजीवनीमुळे पुर्ण
मुलीला वार्षिक ११. ८३ लाखाचे पॕकेज
संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विद्यार्थी बनताहेत लाखोच्या पॅकेजचे मानकरी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावच्या शेतकऱ्याची मुलगी. आई गृहिणी असुन आपली मुलगी शिकून स्वावलंबी व्हावी, ही आई वडीलांची प्रबळ इच्छा होती. कोणते कॉलेज आपल्या मुलीला स्वावलंबी बनवेन याचा बारकाईने अभ्यास करून वडीलांनी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये दाखल केले. कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागात आधुनिक तंत्रज्ञान मिळाले. टी अँड पी विभागाने सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देवुन जोपर्यंत कंपनीच्या कसोटीत पात्र होत नाही तो पर्यंत मॉक इंटरव्ह्यूज (सराव मुलाखती) घेतल्या आणि तीला सक्षम केले. त्यामुळे कंपनीच्या सर्व प्रश्नांची ती आत्मविश्वासाने उत्तरे देवु शकली आणि वार्षिक पॅकेज रू ११. ८३ लाख मिळविले. . विशेष म्हणजे ती त्या परिवारातील नोकरीसाठी बाहेर पडणारी पहिली मुलगी ठरली . शेतकरी वडीलांचे स्वप्न संजीवनीमुळे पुर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया संजीवनी इंजिनिअरींगची विद्यार्थीनीअभियंता प्रांजल आरोटे हिने दिली.
संजीवनी एमबीए व इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या संयुक्तिक प्रयत्नाने अलिकडेच अवलारा कंपनीने घेतलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये दोन एमबीए व एक कॉम्प्युटर इंजिनिअरींग विभागाच्या विद्यार्थ्यांची वार्षिक पॅकेज रू ११. ८३ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनीचे विविध विभाग व टी अँड यांचे जॉब रेडी विद्यार्थी घडविण्यासाठीचे संयुक्तिक प्रयत्न आणि नामांकित कंपन्यांची संजीवनीवर असलेली विश्वासहर्ता यातुन दरवर्षी शेकडो ग्रामीण विद्यार्थी लाखो रूपयांच्या पॅकेजचे मानकरी बनत आहे, जगातील चार खंडात आपल्या कार्याचा विस्तार असलेल्या अवलारा टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने एमबीएच्या तुषार ज्ञानेश्वर बनकर, हर्षल विजय गरदारे व कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या प्रांजल प्रकाश आरोटेची नोकरीसाठी त्यांच्या अंतिम निकालाच्या अगोदरच निवड केली आहे.






